शहादा। शहरात 21 जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता दोन सदस्य असलेली केंद्रीय समिती हगणदरीमुक्त शहर पहाणीसाठी येत असल्याने नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. समिती सदस्य महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर प्रांतातील असतील अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली .शहादा शहर 100% हगणदरीमुक्त झाल्य्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे. जिल्हा पातळी तसेच राज्यपातळीवर शहादा नगरपालिकेची निवड झाली आहे. आता देशपातळीवर निवड व्हावी म्हणून पालिकेने प्रयत्न सुरु केले आहे. त्याची पहाणी करण्यासाठी केंद्रशासनाची केंद्रीय समिती येत आहे. त्यात दोन सदस्यचा समावेश असुन आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी रहातील .समितीने गेल्या महिन्यात शहरातील 40 वसाहतीची नावे मागितली होती पैकी 9 वसाहतीना भेट देतील त्यानंतर समिती सदस्य केंद्रशासनाला अहवाल पाठवतिल.
निवड झाल्यास एक कोटी रुपये
शहादा पालिकेची निवड झाल्यास एक कोटी रुपये मिळणार आहेत.मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळीसह पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. सकाळी 10 .30 वाजता समितीसदस्यांचे नगरपालिकेत आगमन झाल्यावर नगराध्यक्ष मोतीलाल पाटील मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी स्वागत करतील सर्व फाइली कागदपत्रे अहवाल तयार करण्यात आली आहेत. समिती शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयसह स्वछतेची पहाणी करतील म्हणून सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती केली आहे. तर काही नव्याने बाधले जात आहेत. शासनाच्या अनुदानाने नागरिकांनी बांधलेले शौचालय देखील पहाणार आहेत. शौचालयाचे टारगेट पुर्ण केले का याचीसुद्धा पहाणी केली जाईल.