नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या राजधानीतील संचलन सोहळ्याची रंगीत तालीम शुक्रवारी लाल किल्ला येथे घेण्यात आली. यावेळी केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) कॅडेटस व शाळकरी विद्यार्थ्यांना संबोधित केले. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांनी विद्यार्थी व कॅडेटसचा सन्मानही केला.