सीबीआय विरुद्ध कोलकाता पोलीस: उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी !

0

कोलकाता: शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. तर कारवाईस अटकाव करण्यात आल्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. २०१६ पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली.