धरणगाव। केंद्र शासनाकडून कोरोनाने मांडलेल्या थैमानाचा मुकाबला करण्यासाठी महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. मदतीचा पहिला टप्पा हा जमा केलेला आहे. खाते क्रमांकाची अंतिम अंकानुसार टप्याटप्प्याने म्हणजे पुढीलप्रमाणे
ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 0 किंवा 1 असेल, त्या खात्यात 2 एप्रिल रोजी पैसे जमा होतील. ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 2 किंवा 3 असेल, त्या खात्यात 3 एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 4 किंवा 5 असेल, त्या खात्यात 6 एप्रिल रोजी पैसे जमा होतील. ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 6 किंवा 7 असेल, त्या खात्यात 7 एप्रिल रोजी पैसे जमा होतील. ज्या जनधन खात्यांचा शेवटचा अंक 8 किंवा 9 असेल, त्या खात्यात 8 एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
ही रक्कम महिलांच्या खात्यात वर्ग केली जात आहे. रक्कम अनेक दिवसापासून व्यवहार न केलेले खात्यात देखील जमा करण्यात आलेली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रक्कम काढण्यास ग्राहक सेवा केंद्रावरून देखील काढता येईल, असे भारतीय स्टेट बँक धरणगावचे शाखाधिकारी पाडवी यांनी सांगितलं.