केंद्र शासनाच्या आदर्श सांसद ग्राम योजनेतून दिवेआगरचा विकास

0

बोर्ली पंचतन (अभय पाटील)- केंद्र शासनाच्या आदर्श सांसद ग्राम योजनेतून रायगड जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे गाव दत्तक घेतले. या कार्यक्रमांतर्गत विविध खात्याच्या विविध योजनांतून तसेच रायगड जिल्हयातील नामांकित कंपनीच्या सहकार्यातुन दिवेआगर गावामध्ये सुमारे 32 लाख 65 हजाराची विकासकामे गिते यांच्या माध्यमातून झाली. येथे समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधाराही मंजूरीच्या अंतिम टप्यामध्ये असल्याची माहिती दिवेआगरचे शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश भाटकर यांनी पत्रकारांस दिली.

विरोधकांच्या टिका या आमच्या कार्याला उत्तेजन देणार्‍या
यापुढेही दिवेआगरच्या विकासकामांसाठी शिवसेना अनंत गिते यांच्या माध्यमातून कटीबद्ध असल्याचेही सांगून विरोधकांच्या टिका या आमच्या कार्याला उत्तेजन देणार्यान असल्याचे आम्ही समजतो असेही त्यांनी सांगितले. आदर्श ग्राम योजनेतून दिवेआगर गाव दत्तक घेतल्यानंतर ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला जरी या योजनेसाठी प्रत्यक्ष निधी देता येत नसला तरी प्रशासनाची उत्तम माहिती असलेल्या रायगडचे खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंंत्री अनंत गिते यांनी विविध खात्याचा निधी दिवेआगर येथील विकास आराखडयातील विकासकामांसाठी मिळविला.

भूमिगत विद्युत वाहिनीचे काम जवळपास पुर्णत्वास
दिवेआगरमध्ये अंदाजे 3 कोटी निधीची भूमिगत विद्युत वाहिनीचे काम जवळपास पुर्णत्वास झाले आहे तर सुमारे 3 किलोमिटरचा विस्तीर्ण असलेला दिवेआगरच्या समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधाराचे शासनाच्या मंजूरीचे काम अंतिम टप्यात असल्याचे सांगून यापुढेही दिवेआगरच्या विकासकामांसाठी शिवसेना पक्ष नामदार अनंत गिते यांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून कटीबद्ध असल्याचेही भाटकर यांनी सांगितले. ज्या विरोधकांना दिवेआगरच्या विकासकामे करण्याचे कधीही झाले नाही व जी लोक टिका करण्यासाठीच आहेत त्यांच्या टिका या आमच्या कार्याला उत्तेजना देणार्या असल्याचे आम्ही समजतो असेही अखेरीस त्यांनी सांगितले.

जेएस्डब्लयु कंपनीच्या माध्यमातुन 15 लक्ष 75 हजार रूपये निधीचे गावामध्ये वैयक्तिक 63 शौचालय पुर्ण केले.
पंचायत समितीच्या माध्यमातून 84 हजार रूपये निधीचे 30 वैयक्तिक शौचालय.
2 लक्ष निधीचे बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून गावामध्ये दिशादर्शक व नाम फलक,.
सुवर्ण गणेश मंदिराजवळ जिल्हा नियोजन मंडळातून 7 लक्ष निधीचे वॉटर एटीएम् जलशुद्धीकरण सयंत्रण मशीन.
जिल्हा क्रीडा निधीतून5 लक्ष 50 हजार रूपये निधीच्या सुसज्ज व्यायाम शाळेच्या इमारतीचे बांधकाम.