केंद्र शासनाच्या योजनेतून पुणे महापालिकेच्यावतीने केली सुविधा उपलब्ध

0

महिलां करिता मोफत अत्याधुनिक स्वरुपाचे स्वच्छताग्रुह

नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या संकल्पनेतील उपक्रम

खडकी : केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत पुणे महापालिकेच्यावतीने बोपोडी भागात प्रथमच महिलांकरिता मोफत व अत्याधुनिक स्वरुपाचे स्वच्छतागृह (व्हँन) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या संकल्पनेतुन हा स्तुतिजन्य उपक्रम राबविण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहिम राबवली. त्यास सर्व राज्यातुन उत्तम प्रतिसाद मिळाला. खेडोपाडी उघड्यावर शौचालयास मज्जाव घालित शौचालाय अनुदाना नुसार शौचालय उभारण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच खडकीमध्ये असे अत्याधुनिक स्वरूपाचे स्वच्छतागृह सुरू करण्यात आले.

महिलांसाठी महत्वाची सुविधा

शहरी भागात पुरुषांकरिता शौचालये, स्वच्छतागृह सुविधा पुरविण्यात आली आहेत. मात्र महिलांकरीता ही सुविधा महापालिका व स्थानिक प्रशासनाच्यावतीने अत्यल्प स्वरुपात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे महिलावर्गास वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शुगर, बी.पी.सारखे आजार उद्भवलेले तसेच वयोवृद्ध महिलांकरिता रस्त्यांच्या प्रमुख मार्गावर स्वच्छतागृहे अत्यंत गरजेचे असे आहेत. याच अनुषंगाने महिलांच्या सुरक्षित जीवनाकरिता व स्वच्छ आरोग्यासाठी नगरसेविका सुनिता वाडेकर यांच्या संकल्पनेतुन व नगरसेवक प्रकाश ढोरे आणि विजय शेवाळे यांच्या सहकार्याने बोपोडी भागात महिलांकरिता मोफत अत्याधुनिक स्वच्छतागृहाची (व्हँन) सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे.

इंटरनेट वाय-फाय सुविधा

प्रभाग क्रमांक 8 बोपोडी औंध येथिल भाऊ पाटील रोड छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे ही सुविधा सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान उपलब्ध करुण देण्यात आली आहे. या अत्याधुनिक स्वच्छतागृहामध्ये मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधा, गार-गरम पाणी, नॅपकीन व आंघोळीची व्यवस्था ही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपुर्ण वातानुकुलीत स्वरुपाच्या या व्हँनमध्ये महिलांकरीता आवश्यक साधन सामुग्रीची ही सेवा ही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उपक्रमास महिला वर्गांनी उत्तम प्रतिसाद देत त्याचे स्वागत करण्यात आले आहे.