जळगाव। येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय जळगावतर्फे ललित कला भवन येथे गटस्तरावर समरगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी परिक्षकांच्या हस्ते सरस्वतीपूजन करुन स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक केंद्राच्या संघाने उत्कृष्ट समरगीत सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.
मान्यवरांच्याहस्ते विजयी संघांना पारितोषिक वितरीत
स्पर्धेत परिक्षक म्हणून संजय पत्की, रऊफ शेख व विनोद ढगे उपस्थित होते. स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र दीपनगर केंद्र भुसावळ यांचे ‘उज्ज्वल कामगार तु कष्टकरी’ हे समरगीत प्रथम तर कामगार कल्याण, पिंप्राळा येथील संघाने द्वितीय, ललित कलाभवन संघाने तृतीय तर कामगार कल्याण केंद्र देवपुर-धुळे व कामगार कल्याण केंद्र पाचोरा येथील संघाने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. समारोपाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, एच.आर., लक्ष्मी अॅग्रोतर प्रमुख पाहुणे जळगाव पीपल्स बँकेचे सिनि.एच.आर.मॅनेजर निलेश कुळकर्णी, प्रयास फाऊंडेशनचे अध्यक्ष शहेबाज शेख उपस्थित होते. प्रास्ताविक कागार कल्याण अधिकारी कुंदन पंडित खेडकर, सुत्रसंचालन नरेश पाटील, केंद्र संचालक यांनी केले. आभार भानुदास जोशी, कल्याण निरीक्षक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते विजयी संघांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. निकाल वाचन मिलींद पाटील व किशोर पाटील यांनी केले.