केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध एनआरएमयूचे धरणे आंदोलन

0

डीआरएम कार्यालाबाहेर तीन दिवस निदर्शने : सरकारविरोधात घोषणाबाजी

भुसावळ- केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध एनआरएमयूतर्फे सोमवारी सकाळी डीआरएम कार्यालयाबाहेर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सलग तीन दिवस सकाळी ते चार या वेळेत निदर्शने करण्यात येणार आहेत. सुरक्षा विभागात सेवानिवृत्त झालेल्या 60 वर्षांहून अधिक वयस्करांना नोकरीत घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुरक्षेचे काम करणे चुकीचे असताना हा प्रकार म्हणजे रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा असल्याची भावना निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.  मंडळ सचिव पुष्पेंद्र कापडे, मंडळ अध्यक्ष इब्राहीम खान यांनी सुरुवातील सरकारविरोधी धोरणांची माहिती दिली. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना कामावर घेतल्यास एनआरएमयू मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडेल, असा इशारा प्रसंगी देण्यात आला.
धरणे आंदोलनासाठी यांनी घेतले परीश्रम
कॉ.जी.जी.ढोले, टी.आर.पांडव, मंडळ कोषाध्यक्ष, इसरार, श्याम तळेकर, राजेश तायडे, एच.के.चौरसिया, एस.एस.वानखेडे, एम.पी.चौधरी, अजमल खान, रवी चौधरी, युवराज इंगळे, रुपसिंग पाटील, दीपक सुर्यवंशी, जयसिग महाजन, वसंत पथराड, ललित भारंबे, नरेंद्र कुटुरवार, पी.पी.बेंडाळे, शशीकांत मकासरे, भवानी शंकर, वाय.व्ही.पाटील, मो.आसीफ, मो.जाफर, शशी मकासरे, एल.एम.जंगम, प्रवीण शर्मा, योगेश बारी, आर.आर.निकम, निसार खान, दीपक कागडा, वसंत शर्मा, डी.यु.कोळी, अनिल मिसाळ, विकास सोनवणे, विकास कुळकर्णी, आर.एस.साळुंके, किरण सोनवणे, संतोष प्रजापती, सुनील निकम, निनू नाफडे, गुरुदत्त मकासरे, व्ही.एस.पाटील, ए.एस.झोपे, नरेंद्र सोनवणे, अरुण धांडे यांनी परीश्रम घेतले.