केंद्र सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम

0

जळगाव । केंद्रातील एनडीए सरकारला शुक्रवारी 26 मे ला तीन वर्ष पुर्ण होत असल्यातुळे भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगरतर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा महानगरतर्फे शुक्रवारी सकाळी 11 वाजता बळीराम पेठेतील वसंत स्मृर्ती येथे देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना एनडीए सरकारने केलेल्या तीन वर्षातील कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांना भाजपा जिल्हा महानराचे पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, विविध आघाडीचे अध्यक्ष, युवा मोर्चा, आघाडी नगरसेवक तसेच भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्ये उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस विशाली त्रिपाठी, दिपक सुर्यवंशी, शिवदास साळुंखे, महेश जोशी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर आदींनी केले आहे.

असे असणार कार्यक्रम
केंद्राच्या एनडीए सरकारला तीन वर्ष पुर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्त शुक्रवारी नागरिकांच्या मोबाईलमध्ये भिम अ‍ॅप डाऊनलोड करणे, खासदार ए.टी.पाटील व आमदार सुरेश भोळे तसेच आमदार चंदु पटेल यांच्या हस्ते गरजु व गरीब महिलांना शिलाई मशिन वाटप करणे, पंडीत दिनदयाळ उपाध्याय जन्म शताब्दी वर्षानिमित्त जुन महिन्यात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे, सुरक्षा विमातंर्गत लाभार्थ्यांचा नव्याने 12 रुपयांचा विमा काढून देणे, असे विविध कार्यक्रम भाजपा जिल्हा महानगरतर्फे आयोजित करण्यात आले आहे.