केंद्र सरकारच्या योजनांमुळे हमालांची उपासमार

0

जळगाव । रेल्वे बाबत सरकारच्या विकासात्मक योजना रेल्वेत हमालीचे करणार्‍या कुली च्या जीवावर उठली आहे. मोदी सरकारचे मंत्री सुनील प्रभू यांनी देशातील रेल्वे स्थानक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विविध सुविधा देण्यासाठी साठी सरकारने पाऊले उचलेले आहे. यासाठी युद्धपातळीवर देखील कामे सुरु करण्यात आली. मात्र रेल्वेच आपले उदरनिर्वाहाचे साधन मानणार्‍या हमाल बांधवांचे रेल्वेत काम करण्याचे भवितव्य धोक्यात आले चतुर्थ श्रेणीचा दर्जा असताना रेल्वे प्रशासनाकडून अन्याय होत आहे. जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना रेल्वे स्थानकावर येण्यासाठी दोन मजली लिप्टचे काम करण्यात येते आहे. येत्या काही महिन्यात लिप्ट कार्यान्वित देखील होणार असल्याने सामान वाहण्यासाठी आता हमाली करणार्‍या कुली बांधवाना रोजगार उपलद्ध होण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. चतुर्थ श्रेणीचा दर्जा असताना रेल्वेने आता पर्यत सामावून घेतलेले नाही. रेल्वेने जर सामावून घेतले तर आमचा रोजगाराचा प्रश्न सुटणार असून; यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने आणि सरकारच्या माध्यमातून पावले उचलावी अन्यथा कुटुंबावर उपासमारीची वेळ असल्याची व्यथा रेल्वे मधील कुली बांधवानी जनशक्तीशी बोलताना मांडली आहे.

आश्वासनांची बरसात
रेल्वे कामगार संघटनेच्या वतीने आश्वासन देण्यात येतात मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल संघटनच्या माध्यमातून आता पर्यत झालेली नाही. गेल्या अनेक वर्षा पशु जीवाचे हाल होत दिल्ली गाठावी लागते. यामध्ये आम्हाला आतापर्यत आश्वासने देण्यात आली. मात्र आता पर्यत कुठल्याही प्रकारची अमलबजावणी
झालेली नाही. आतापर्यंत झालेल्या अधिवेशनात आम्हाला फक्त आश्‍वासने देण्यात आली. मात्र आतापर्यंत न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

बेरोजगारीने कुटुंबाला अडचणीचा सामना
लग्नाचे आणि उन्हाळाच्या सुट्ट्याचे मौसम असताना रेल्वे स्थानकावर प्रवाशाची संख्या कमी आहे. प्रवाशांमध्ये ट्रालीबँगची अधिक क्रेज असल्याने कुलीला बांधवांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. 2008 मध्ये लालू प्रसाद यादव हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना चतुर्थ श्रेणी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट केल्यानंतर फक्त दर्जा देण्यात आला मात्र प्रत्यक्षात आता पर्यत रेल्वे सामावून घेतलेल नसल्याने हमाल कुली मध्ये नाराजीचे वातावरण आहे. सरकार बदल्याने दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. गेल्या काळात एका प्रचारादरम्यान राम विलास पासवान यांनी सरकार आल्यास रेल्वेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रिय मंत्री होऊन 3 वर्षे झाली दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. रेल्वे स्थानकाच्या विकासात्मक दृष्ट्या मोदी सरकारने पाऊल उचलेले खरे पण त्याचे परिणाम कुलीच्या उपासमारीवर झाले आहे. रेल्वेत स्थानकावर मिळेल ते काम करण्यासाठी तयारी असल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे. कामासाठी बाहेर शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे एका कुलीने सांगितले आहे.

रेल्वे स्थानक सुनाट
उन्हाळाचे वातावरण असताना शहर अधिक प्रमाणात तापत असून रेल्वे स्थानक देखील यामुळे सुनाट पडलेले आहे. यामुळे हाताला देखील काम नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्मान झाला आहे. रोजगार नसल्याने कुटुंबात आर्थिक चणचण भासत आहे. यामुळे परिवार चालवण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रेल्वे स्थानकात सध्या 22 कुली कार्यरत आहे. यामध्ये एकूण 10 कुली वृद्ध असून इतर रोजगारासाठी बाहेरच्या शोधात आहे. रेल्वे स्थानावर चालता येत नसलेल्या प्रवाशांना व्हीलचेअर अथवा ट्रेचरवर आणले जात होते. आत लिप्ट सुरु होत असल्याने त्यातून मिळणार्‍या रोजगार थांबणार आहे. कधीकाळी 800 ते 1000 रोज प्रवाशांचा सामान वाहण्यासाठी मिळत असे आता तो 100 ते 200 वर आलं आहे. रेल्वेने कुली हे नाव बदलून सहाय्यकाचा दर्जा दिला आहे.

रेल्वे स्थानकात लिप्ट काही दिवसात सुरु होत असून यामुळे प्रवाशी आता रेल्वे स्थानकावर येण्यासाठी त्याचाच वापर करणार आहे. रोजगाराचा प्रश्न गेल्या अनेक दिवसा पासून सतावत आहे. बेजरोजगारी अधिक प्रमाणात वाढत असून माहिती अधिकाराच्या खाली रेल्वे प्रशासना सोबत लढा सुरु आहे. न्यायासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा विचार आहे.
– संजय लक्ष्मण माळी

काही दिवसापूर्वी कुलीच्या कामाला सुरुवात केली आहे. भाड्याच्या घरात राहून दिवस काढत असून शिक्षण असल्यावर देखील हमालीचे काम करीत आहे. रेल्वे प्रशासनाने आमची दखल घेण्याची गरज असल्याने रेल्वे सामावून घेतल्यास उपासमारीची प्रश्न सुटणार आहे. आताच्या सरकारने आमच्या कडे एक वेळा बघावे. आम्हाला खूप अपेक्षा आहेत.
– योगेश गवळी

रेल्वे कामगार संघटनेच्या दिल्ली येथे अधिवेशनाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत. अनेक वेळा समस्या मांडण्यात येतात. पण न्याय मिळत नाही. चतुर्थ श्रेणीचा दर्जा असताना आम्हाला सरकारी सेवेपासून नाकारण्यात आले आहे. खासदार रक्षा खडसे यांना निवेदन दिले मात्र अद्याप पर्यत दखल घेतली गेलेली नाही.
– मोहन गायकवाड

वृद्ध असताना कामे करावी लागत आहे. वर झाल्याने अवजड सामान उचण्यात कसरत करावी लागते. अनेक वेळा सामान उचलताना जखमी झालो. पोटापाण्यासाठी काम करावेच ल;लागते. सरकारने रेल्वेत कुलीना सामावून घेतल्यास सुविधा मिळणार असून पेन्शन वर पुढील जीवन काढणे शक्य आहे.
– शकील शेख गमीर शेख