पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत चिंचवड येथील केएसबी चौकात टेल्को रस्त्यावर निगडी ते भोसरीच्या बाजूने बांधण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटरचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे केएसबी चौकातील वाहतुक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर,’अ’ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, आशा शेंडगे-धायगुडे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित गोरखे, सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, आदी उपस्थित होते.
16 कोटी 20 लाख रुपये खर्च
या ग्रेड सेपरेटरची लांबी 480 मीटर असून रुंदी 10.2 मीटर एवढी आहे. या कामासाठी 16.20 कोटी रुपये खर्च आला आहे. हा ग्रेडसेपरेटर 480 मीटर लांबीचा आहे. त्याची रुंदी 10.2 मीटर आहे. 7.50 मीटर रुंदीचा हा ओपन ग्रेड सेपरेटर बांधण्यात आलेला आहे. त्यामध्ये एक मीटर पाणी जाण्यासाठी, 1.7 मीटर झाडे लावण्यासाठी (फ्लोवर सेड) जागा ठेवली आहे. यामुळे ग्रेड सेपरेटच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. या ग्रेड सेपरेटरची उंची 5.50 मीटर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे जड वाहने, कंटेनर, ट्रेलर्स यांची वाहतूक सहज होणार आहे.