केक घेऊन जाऊन मित्राला वाढदिवसाचे देणार होता सरप्राईझ; त्यापूर्वीच केली आत्महत्या

0

जळगाव : शहरातील पिंप्राळा येथील सुमित कैलास खेडकर वय : २५ या तरुणाने बजरंग बोगद्याजवळ रेल्वे लाईनवर आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्रीसाडे आठ वाजेच्या सुमारास घडली. खिशातील पॅन कार्ड व आधार कार्ड यावरून त्याची ओळख पटली. सुमित हा त्याचा रामेश्वर कॉलनीतील मित्र सागर याला मध्यरात्री १२ वाजता केक घेऊन जाऊन वाढदिवसाचे सरप्राईझ देणार होता. मात्र त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मारुतीची नोंद करण्यात आली आहे.