नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. ७० पैकी ५८ जागांवर आम आदमी पक्षाला आघाडी आहे तर १२ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दरम्यान निकालावर राजकीय नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया देण्यात सुरुवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेली मोफत वीज योजना मतदारांना आवडल्याचे सांगत ती आम आदमी पक्षाच्या पथ्यावर पडल्याची कबुली दिली आहे.
निकालानंतर दिल्लीकरांनी देखील वीज मोफत देण्याचा फायदा आपला झाले असल्याचे सांगितले. वीज बिल ० रुपये आल्यानंतर गरिबांना आनंद होतो असे दिल्लीकरांनी सांगितले.
भाजपने दिल्लीची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली होती. देशभरातील मातब्बर नेते दिल्ली निवडणुकीच्या प्रचार मैदानात उतरले होते. मात्र तरीही भाजप सत्तेपासून दूरच आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केजरीवाल यांनी 200 पेक्षा अधिक युनिट वीजेचा वापर न केल्यास वीज पूर्णपणे मोफत अशी घोषणा केली होती. यामुळे सरकारवर वर्षाला 1800 ते 2000 कोटींचा बोजा पडणार, असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2015 मध्ये सत्तेत आल्यानंतर लगेच आपने वीज बिलात 50 टक्के सूट दिली होती.