नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे आमदार कपिल मिश्रा यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला. भाजपा खासदार आणि दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मिश्रा हे आम आदमी पक्षात असून देखील ते सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत होते, त्यामुळे ते भाजपात जाणार अशी चर्चा होती, अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मिश्रा भाजपात गेल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील करवालनगरमधून ते आपच्या तिकिटावर निवडून गेले होते.