नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या पराभवावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केजरीवाल यांच्यावर निशाना साधला आहे. केजरीवाल फक्त बोलतात, त्यांची कृती मात्र शून्य आहे, अशी खरमरीत टीका अण्णांनी केली.
काही दिवसांपूर्वीच अण्णा हजारे यांनी सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे, अशी बोचरी टीका करत सुनावले होते. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने व केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे. समितीच्या आरोपानंतर मला अत्यंत वेदना झाल्या, अशा शब्दांत अण्णांनी केजरीवाल यांना खडेबोल सुनावले. केजरीवाल कृती करण्यात कमी पडले असून, त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक असल्याचही अण्णांनी स्पष्ट केले. केजरीवालकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. त्यांनी माझ्या सर्व अपेक्षा धुळीस मिळविल्या आहेत. त्यांचे नेतेही कायदा पायदळी तुडवत असल्याचे त्यांनी सांगितले.