दिल्ली :मुख्यमंत्री निवासस्थानात मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य ११ आमदारांना समन्स पाठवले आहे. या सर्वांना २५ ऑक्टोबर रोजी कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री निवासमध्ये दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना ‘आप’ च्या आमदारांनी मारहाण केली तसेच त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली, असा आरोप आहे. याप्रकरणी १३ ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य ११ आमदारांचा आरोपपत्रात समावेश आहे. १५३३ पानांचे आरोपपत्र पतियाला हाऊस कोर्टात दाखल करण्यात आले. एकूण १३ जणांना आरोपी बनवण्यात आले असून केजरीवाल यांचे तत्कालीन मुख्य सल्लागार व्ही. के. जैन यांना साक्षीदार बनवण्यात आले आहे.