पुणे : केजे अभियांत्रिकी, ट्रिनिटी अभियांत्रिकी व ट्रिनिटी अॅकॅडमी या तीनही महाविद्यालयांतून उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात यशस्वी पणे कार्यरत असणार्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सध्या महाविद्यालयात शिकत असणार्या विद्यार्थ्यांना सेवाक्षेत्र व उद्योगजगतेवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये नवोदित विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांना विविध प्रश्न विचारले. मुलाखत कशी द्यावी, तणावाची स्थिती कशी सांभाळावी, परकीय भाषेचे ज्ञान असावे का?, नियमित अभ्यासक्रम हाताळताना आणखी कुठले ज्ञान असावे, तसेच अभियांत्रिकी शाखानुसार कोणते कौशल्य असावे, अशा विविध प्रश्नांची सविस्तर चर्चा झाली. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणार्या पंचावन्न विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे खजिनदार विनोद जाधव यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.
माजी विद्यार्थी ताहेर अजनावाला या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. स्वतःच्या प्रयत्नावर अनिकेत लगड (इलेक्ट्रॉनिक) या विद्यार्थ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात कशी प्रगती केली, याविषयीचे अनुभव व्यक्त केले. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, हर्षदा जाधव, विभावरी जाधव, डॉ. हेमंत अभ्यंकर, प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर व े प्राचार्य डॉ. विजय वढाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद दस्तूरकर व राहुल उंडेगावकर यांनी केले.