कल्याण : कल्याण पूर्वेकडील नेतीवली मेट्रो मॉल समोर राहणारे मुन्ना यादव यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. 8 तारखेला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील आनंद नगर परिसरात राहणारा जयवंत धनगर याने मुन्ना यांना तुझा केटरिंगचा व्यवसाय जोरात सुरू असून तुला व्यवसाय करायचा असेल तर 10 हजार रुपये दे असे सांगत मुन्ना याना मारहाण करत धमकी दिली.
त्यानंतर पुन्हा 16 तारखेला कल्याण पुर्वेकडील पाकिजा गॅरेजसमोर गाठत मुन्ना याला पुन्हा वारंवार धमकावले जात असल्याने त्रस्त झालेल्या मुन्ना यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.