केटामाईन जप्त

0

चिपळूण – केटामाईन या अंमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आणखी 5 किलो 880 ग्रॅम वजनाच्या 4 कोटी 78 लाख 20 हजार 220 रूपये किंमतीचे केटामाईन जप्त करण्यात आले आहे.

अटकेत असलेल्या मंगेश कदम याने लोटे येथील सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीत काम करताना ही पावडर चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाणार असून या प्रकरणाची जिल्हा व जिल्ह्याबाहेरही मोठी व्याप्ती असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.