मुंबई | चिपळूण शहरातील विरेश्वर तलाव परिसरात केटामाईन या अंमली पदार्थाची विक्री प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य विजय औटी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.केसरकर म्हणाले,केटामाईन हे कर्करोगावरील रुग्णांच्या उपचारात वेदनाशामक म्हणून वापरण्यात येते.चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये या संबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन यासंबधी हायकोर्टात अपील सुरू आहे.
सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन कोकण विभाग यांच्या अहवालावरून 20 जून 2017 रोजी केटामाईनचे उत्पादन तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अन्न व औषध प्रशासन व गृह विभागाची याबाबत बैठक घेऊन या पदार्थाची चोरी होवू नये,असे निर्देश देण्यात येतील, असे ही त्यांनी सांगितले.