केटीवेअर पुलाच्या बांधकामाची मागणी

0

शहादा । तालुक्यातील मलोणी गावालगत गोमाई व सुसरी नदिचा संगम आहे. दोघा नदिचे पाणी शेवटी वाया जाते यासाठी येथे केटीवेअर कम पुलाचे बांधकाम करण्यात यावे असे आशयाची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना मलोणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की,तालुक्यातील मलोणी व उंटावद या गावालगत गोमाई व सुसरी नदिचा संगम झाला आहे. उंटावद व मलोणी दरम्यान गोमाई नदिचे 160 मीटरचे पाञ आहे. पावसाळ्यातील पाऊसामुळे नदिपाञातून या गावांचा नागरीकांचा संपर्क तुटतो.सुसरी नदिवर धरणाचे काम झाल्याने त्याचे पाणी येणे ऊटापास्त झाले आहे. सुसरी धरण असुन शेतजमिन शेतकरी व जनतेस त्याचा फायदा होत नाही. सुसरी नदी पाञाचे सुमारे सुमारे साडेतीन कि.मी.अंतराचे पाञ कोरडे आहे.

ग्रामस्थाच्या सोयीसाठी
सुसरी- गोमाई नदी संगम लगत पुल कम केटीवेअर टाईप बंधारा जलसंधारण योजनांतंर्गत तयार झाल्यास उंटावद-लोणखेडा-मलोणी-होळ-मोहिदा या गावांची पाण्याची टंचाई दूर होत शेतजमिनीस त्याचा फायदा होणार आहे. तसेच उंटावद-मलोणी दरम्यान पुल झाल्यास उंटावद येथील जागृत देवस्थान रोकडमल हनुमान मंदिर येथे येणा-या भाविकांसाठी व ग्रामस्थांनसाठी सोईस्कर होणार आहे.

गोमाई नदी लगत मलोणी गाव असून देखील या गावास दिवसातून एक वेळीस पाणी उपलब्ध होत आहे. गावालगतच पालिकेचे जँकवेल आहे मलोणी-उंटावद गावादरम्यान पुल कम केटीवेअर बंधारा बांधुन भविष्यात पाणी साठवण होईल अन्यथा या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपसरपंच भरत शंकर पाटील, विलास शिवदास पाटील, शरद फकिरा पाटील, प्रदिप शिवदास पाटील, भाईदास शिवदास पाटील, तुकाराम सोमजी पाटील, रमन मदन पाटील, महेंद्र यादव पाटील, विनय रोहिदास पाटील ,प्रशांत श्रीपत पाटील, भरत फकिरा पाटील यांनी केले आहे.