केडीएमसी होणार ई कचरामुक्त

0

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी आणण्यात आली आहे. या संदर्भात महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महापौरांनी शहर स्वच्छतेकरीता पुढाकार घेवून मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीची घोषणा केली होती. सोमवारी बिर्ला महाविद्यालयामध्ये या मध्यवर्ती शहर स्वच्छता समितीची बैठक महापौर राजेंद्र देवळेकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व शाळेमध्ये ई-कचरा, प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ भारत अभियान बाबत विद्यार्थ्यांना शपथ दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

तसेच 14 ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधून ई कचरा अंतर्गत येणार्या सगळया वस्तू जमा केल्या जाणार असल्याचे संगण्यात आले. या कामी महानगरपालिकेचे कर्मचारी प्रत्येक शाळांमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून दुपारपर्यंत ई कचरा गोळा करणार आहेत. महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना 14 ऑगस्ट रोजी आपल्या शाळेतील, घरातील ई कचरा, प्लास्टिक वस्तू विद्यार्थ्यांजवळ देण्यात येऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. ज्या शाळांमधून जास्तीत जास्त ई कचरा जमा होईल, त्यांना महानगरपालिकेमार्फत गौरविण्यात येइल. आजच्या या बैठकीमध्ये बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, उपमहापौर मोरेश्वर भोईर, उपआयुक्त धनाजी तोरस्कर, भाजप गटनेते वरूण पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष खुशबू चौधरी, मनीषा तारे, महिला बाल कल्याण समिती सभापती वैशाली पाटील, नगर सेवक कासिफ तानकी तसेच डोंबिवली व्हिजन चे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर व मध्यवर्ती शहर स्वच्छ समितीचे सदस्य उपस्थित होते.