मुंबई : ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या पोस्टरचा फर्स्ट लूक प्रसिध्द करण्यात आला आहे. या चित्रपटातून सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिषेक कपूरद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्यामुळे काही दिवसांपासून सारा चांगलीच चर्चेत आहे.
पोस्टर मध्ये सुशांत सिंग आपल्या पाठीवर साराला वाहून नेत असताना दिसतोय. या चित्रपटातून साराचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक नजरा तिच्या परफॉर्मन्सवर लागलेल्या आहेत. ‘केदारनाथ’ चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.