मुंबई : ‘केदारनाथ’च्या यशानंतर सुशांत सिंग राजपूतचा भरपूर कौतुक होत आहे. ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’. ‘काय पो चे’, या चित्रपटातही त्याने दमदार भूमिका साकारल्या. आता सुशांतकडे चित्रपटांची रांग लागली आहे.
https://www.instagram.com/p/BsX7DdQFqvP/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/BsVnCnLFzQq/?utm_source=ig_embed
सुशांतला तब्बल १२ चित्रपटांची ऑफर्स मिळाल्याचे खुद्द सुशांतनेच एका माध्यमाला सांगितले आहे. ‘या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट निवडावा हे मला कळत नाहीये. यातला एकही चित्रपट मला सोडावासा वाटत नाही. यातले किती चित्रपट तयार होतील आणि किती चित्रपटांमध्ये मला काम करता येईल यासंबधी विचार सुरू आहे’, असे त्याने सांगितले आहे.
सुशांतचा अलिकडेच ‘सोन चिडीयां’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘किझी और मॅनी’ या चित्रपटासाठीही त्याची वर्णी लागली आहे. या चित्रपटांव्यतिरीक्त तो छिछोरे, आणि ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटातही दिसणार आहे.