‘केदारनाथ’मध्ये साराचा परफॉर्मन्स पाहून करिना देणार एक खास पार्टी

0

मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. सारावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. केदारनाथमधील प्रलयावर आधारित असलेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटामध्ये साराने सुशांतसिंह राजपूतसोबत स्क्रिन शेअर केली. साराच्या अभिनयशैलीमुळे बॉलीवूडची बेबो आणि सैफची पत्नी करिना कपूरदेखील खुश झाली असून तिने सारासाठी पार्टीचं आयोजन केलं आहे.

करिनाने आयोजित केलेली ही पार्टी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्टीची तयारी खुद्द करिना करणार आहे. त्यामध्ये सैफ,करिना आणि साराचे जवळचे मित्र-मैत्रिणी असतील.