जळगाव । पोस्टाचे कार्मचारी गुरूवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास शिवाजीनगरच्या बाजुने असलेल्या 5 क्रमांकाच्याजवळ पोस्टाचे पार्सल ठेवत होते. नवीन प्लॅटफार्मचे काम सुरू असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या केबल उघड्याच आहेत. गुरूवारी सायंकाळी या केबलमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. त्यात पोस्ट पार्सलच्या 40 बॅग खाक झाल्या. तर काही अंतरावर असलेल्या डिपीतही आग लागली होती. मात्र अग्निशमन विभागाच्या बंबाने वेळेवर येऊन आग आटोक्यात आणली. जिल्ह्यातील जमा केलेले पोस्टाचे पार्सल दररोज सायंकाळी रेल्वेच्या आरएमएस कार्यालयात घेऊन जातात. गुरूवारी सायंकाळी पोस्टाचे कर्मचारी काम सुरू असलेल्या प्लॅटफार्म क्रमांक 5 वर पार्सल आणून ठेवत होते. बाजुलाच काम सुरू असल्याचे पावर केबलही उघड्याच होत्या. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अचानक त्या केबलमध्ये शॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे पोस्टाच्या पार्सलच्या बॅगही जळायला लागल्या. एकूण 86 बॅग ठेवलेल्या होत्या. त्यापैकी कर्मचार्यांनी प्रयत्न करून 46 बॅग वाचविल्या. मात्र 40 बॅग आगीत खाक झाल्या.
एमपीडीएच्या फरार आरोपीच्या घरावर नोटीस
जळगाव । अमळनेर पोलिस ठाण्यातील एमपीडीएच्या प्रस्तावातील घनशाम उर्फ शामकांत जयवंतराव पाटील रा.न्यु पटवारी कॉलनी याचे विरुध्द विविध स्वरुपाचे 10 गुन्हे दाखल असल्याने एमपीडीएचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुर होवून आदेश बजावणी होण्यापुर्वीच शामकांत पाटील हा फरार झाल्याने आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने 17 एप्रिल पुर्वी पोलिस अधिक्षकांकडे उपस्थित होण्यास फर्माविण्याबाबत उदघोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्याने सदरचा आदेश 30 रोजी त्याच्या घराच्या दर्शनी भागावर पंचासमक्ष लावण्यात आला.