केमिकल टँकर-ट्रक अपघाताने वायुगळती

0

नवापुर । येथील नागपूर-सुरत महामार्गावरील रंगावली नदीच्या पुलावर गुजरात येथून एच.सी.एल केमिकल घेऊन जाणार्‍या टँकर आणि ट्रकचा अपघात सकाळी 8ते 9 च्या दरम्यान झाला. या अपघातात केमिकल टँकरला गळती लागली आणि क्षणात दुर्गंधीयुक्त वायू पसरण्यास सुरुवात झाली. या महामार्गाच्या जवळपास लोकांच्या डोळ्यांना आणि नाकात जळ-जळ होत आहे. एवढेच नव्हे, तर हे रसायन नदीच्या पाण्यात सुद्धा मिश्रीत झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अपघातग्रस्त टँकरमध्ये तब्बल 20 हजार लीटर एचसीएल रसायन होते. सुदैवाने लिक्विड केमिकल हे घातक नसल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार राजेद्र नजन, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत आणि त्यांची टीम घटनास्थळी तळ ठोकून होते. परिसरातील नागरिक आणि शासकीय कर्मचार्‍याचा सहकार्याने पाण्याच्या टँकरद्वारे केमिकल नष्ट करण्यात यश आले आहे. टँकरतुन पांढर्‍या रंगाचा केमीकलचाधुर 1 किमी पर्यंत सर्वदुर पसरुन कोणाला काहीच दिसत नव्हते. जो तो केमिकल आपल्या शरिरात जाईल.स्फोट होईल म्हणुन सैरावैरा धावत सुटले होते. पुलावरुन टँकर खाली पडला अशी अफवा शहरात वायु वेगाने पसरली होती. अफवा, भय, चर्चा आणि शांतता अशा घडामोडी दिसुन आल्या.

माहिती मिळताच पोलिसांनी घेतली धाव
या दुर्घटनेची माहीती माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांनी सकाळी 8:30 वाजता दुरध्वनीवरुन पोलिस स्टेशन व नवापुर नगरपालिकेला तातडीने दिली. ही माहीती मिळताच पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत व सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, उपनिरीक्षक दिपक पाटील, संतोष भंडारे, ताथु निकम, संगिता कदम, नायबतहसिलदार राजेंद्र नजन, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, न.पा बांधकाम अभियंता सुधिर माळी, राजेंद्र चव्हाण आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच न.पा अग्नीशामन बंबला घटनास्थळी पाचरण केले.

सुदैवाने अनर्थ टळला
महामार्ग क्र 6 वर यापुर्वी अपघात होऊन टँकरमधील केमिकल लिंकेजचा घटना घडल्या आहेत. सुदैवाने स्फोटक केमिकल नसल्याने मोठा अनर्थ प्रशासनाच्या सतर्कामुळे टळला आहे. महामार्गावरील रोजचे अपघात रोज अन्य राज्यातील मोठ मोठे टायर वाले वाहन, स्फोट व अन्य केमिकल घेऊन जाणारे टँकर यामुळे महामार्ग म्हणजे मुत्यूचा सापळा बनला आहे.

माजी नगराध्यक्ष दामु बिराडे यांची तत्परता
माजी नगराध्यक्ष दामु वना बिराडे हे पायी तिकडुन जात असतांना त्यांनी हा अपघात पाहीला. त्यांनी तेथुनच मोबाईलने पोलीस,तहसील कार्यालय प्रशासन,नगर पालिकेचा अग्निशामक बंबला घटनेची माहिती दिल्याने प्रशासनाने लागलीच आपत्कालीन उपाय योजना केली. माजी नगराध्यक्षांचा प्रसंगावधान तत्परतेचा माहितीमुळे वेळीच त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.

प्रसंगावधाने चालकाने केली हुशारी
केमिकल भरलेला टँकर चालक रामराल सरोजरामचंद्र अंकलेश्वरवरुन नागपुरकडे हे केमीकल घेऊन जात होता. केमिकल लिकेज होताच गाडीवरील चालकांने हुशारीने लगेच लिकेच भागाला कापड व प्लास्टीकचा बोळा दाबुन लिकेच बंद केले. तोपर्यत 1 कि.मी अंतरापर्यंत केमिकलचा धुर पसरला होता. यावेळी नदी काठी राहणारे नागरीक भयभीत झाले होते. या वेळी अग्नीशामक बंबने पुर्ण परीसर पाण्याने धुण्यात आला. रंगावली नदीत केमिकल मिश्रित झाल्याने पाणी दुषीत झाले आहे. नवापुर नगरपालिकेतर्फे अहवान करण्यात आले आहे की रंगावली नदीचे पाणी कोणही नागरीकांने वापरात घेऊ नये. नदीमध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण हायवे धुराने व्यापला
नवापुर शहरालगत असलेल्या नॅशनल हायवे 6 वर सुरत-धुळे या रस्त्यावर आज सकाळी रंगावली पुलाचा वळनावर धुळेकडे जाणारी ट्रक एचआर 55.एन.0572 या ट्रँकवरील चालक शिवकुमार प्रजापती सुरतहुन रायपुर छतीगडकडे जात होता. त्यापुढे चालत असलेला केमीकल भरलेला ट्रक जीजे 15.युयु 9995 ने मागुन धडक टँकरला दिल्याने त्यामध्ये भरलेले केमीकल गळती सुरु झाली. यामुळे संपुर्ण हायवेवर केमीकलचा धुर निर्माण झाला. परिसरात धुर पसरत असतांना ट्रॅकचालक यांनी ट्रक सोडुन पळ काढला. यामुळे 1 तास हायवेवर ट्राफीक जाम झाली होती.

खड्ड्यांत सोडले केमिकल
यानंतर त्या केमिकलने भरलेला टँकरला पिंपळनेरे रस्त्यांचा लगत तहसिलदार यांचा आदेशाने शासकीय जागेत 20बाय 20 चा खडा जे.सी.बी ने करुन ते केमिकल त्या खडयात सोडण्यात आले. यावेळी व्यारा,सोनगड,नंदुरबार,या भागातुन ही अग्निशाम बंब मागविण्यात आले होते. या वेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.टँकरमधील केमिकल हे एच.सी.एल केमिकल होते. ते फरशी, शौचालय,धुण्यासाठी वापरण्यात येते. आपत्कालीन उपाय योजना करण्यात नवापुरचे प्रशासन यशस्वी ठरले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. अपघातग्रस्त टँकर पुलावरुन काढुन दुतर्फा लागलेल्या प्रचंड ट्रकांचा रांगा अखेर वाहतुक सुऱळीत करण्यात आली. दुपारी 1 वाजता प्रशासनाचा जीवात जीव आला.

एक तास वाहतूक ठप्प
या घटनेमुळे तब्बल एक तास महामार्गा दुतर्फा वाहतुक ठप्प झाली होती यात चालक वाहक एस बस व अन्य वाहनातील प्रवाशी यांची फारच हाल झाले तासभर बिचारे तेथेच तात्काळत बसुन होते काही लहान वाहने इकडुन तिकडे वाहन काढत पुढे जाण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत होते शारिरिक,मानसिक व आर्थिक हाल यावेळी पाहायला मिळाले. या घटनेनंतर ट्रक चालकाने केमिकल टँकरला टक्कर देऊन अपघात केल्या प्रकरणी ट्रक चालकाविरुध्द नवापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.