औरंगाबाद । शहराच्या मध्यवस्ती असलेल्या किराडपुरा भागात केमिकलचा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमध्ये 2 लहान मुले जखमी झाली असून दोघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एफरा अनिस आणि वासिम खान या दोघांच्या पायांना दुखापत झाली.
वासिम खान पायी जात असताना पहिला स्फोट झाला. त्याला मदत करण्यासाठी नागरिक धावले असता लगेच दुसरा ब्लास्ट झाला आणि त्यात एफारा अनिस ही मुलगी जखमी झाली. सुरुवातीला सुतळी बॉम्ब फुटल्याचा भास नागरिकांना झाला. मात्र हा स्फोट केमिकलचा असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. त्यानुसार एटीएसचे आणि फोरेन्सिकचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.