केमिस्ट संघटनेचे नेतृत्व भंगाळेंकडेच

0

जळगाव । जिल्हा औषध विके्रता संघटनेच्या अध्यक्षपदाची त्रैवार्षिंक निवडणूकीत सुनिल भंगाळे यांची बहुमताने निवड झाली आहे. या निवडणूकीत सुनिल भंगाळे यांच्या नम्रता पॅनलचे 16 उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. एकतर्फी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत सुनिल भंगाळे यांना 1 हजार 786 मतांनी विजय प्राप्त केला आहे तर भंगाळे यांच्या विरोधात अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून लढत देणारे दीपक जोशी यांना केवळ 27 मतांवर समाधान मानवे लागले.

मतदान सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
सुनिल भंगाळे यांच्या नम्रता पॅनलचे 16 उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. जिल्ह्यातील औषध विके्रता संघटनेची त्रैवार्षीक निवडणुक आज केमिस्ट भवनात पार पडली. अध्यक्षपदासाठी ही निवडणुक झाली. या निवडणुकीत सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान झाले असून यामध्ये जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी मतदान केल. यात दिवसभरात 1 हजार 825 जणांनी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर 12 मते बाद ठरली.

एकच वादा सुनिल दादा…
अध्यक्षपदासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती. यानंतर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. परंतू निवडणुकीचा निकाल घोषित होण्याआधीच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नम्रता पॅनलमधील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करीत जल्लोषास सुरूवात केली होती. नम्रता पॅनलचे 16 उमेदवारांची निवड झालेली असतांना आज झालेल्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनिल भंगाळे यांचे नाव विजयी म्हूणन घोषीत होताच नम्रता पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून आता फॉर्म भरशील का… नाही रे भो… नाही रे भो…, एकच वादा सुनिल दादा यासारख्या घोषणांनी केमिस्ट भवन दणाणले.

दिपक जोशींना 27 मते
अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले दीपक जोशी यांना केवळ 27 मते तर सुनिल भंगाळे यांना 1 हजार 786 मते मिळून ते बहुमताने विजेते ठरले. निकालाची घोषणा होण्याच्या आधीच नम्रता पॅनलकडून ढोल-ताशाच्या तालाव फटाक्यांची आताषबाजी करून ठेका धरण्यात आला होता. निवडणुक अधिकारी म्हणून संजय पाठक, प्रविण कोठावदे, भानुदास नाईक यांनी काम पाहिले. तर निवडणुक यशस्वतेसाठी अनिल कोळंबे, प्रकाश वाणी, प्रकाश चव्हाण, वैभव तायडे, ललित सावदेकर यांच्यासह औषध विक्रेत्यांनी कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित कार्यकारणी
औषध विक्रेत्या संघटने अध्यक्षपदी सुनिल भंगाळे तर उपाध्यक्षपदी बनवरीलाल अग्रवाल, महेंद्र महाजन, ब्रजेश जैन यांची तर इतर विविध पदांसाठी अनिल झंवर, रुपेश चौधरी, श्रीकांत पाटील, अनिरुद्ध सरोदे, शामकांत वाणी, संजय तिवारी, जितेंद्र जैन, नरेंद्र पाटील, सुरेश भंडारी, अमित चांदीवाल, दिनेश मालू, राजेंद्र पाटील, इरफान सालार यांची बिनविरोध निवड झाली.