राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम : 10 सप्टेंबरपर्यंत करता येणार मदत
भुसावळ- केरळमध्ये पावसामुळे आलेल्या महाप्रलयानंतर आपत्तीग्रस्त नागरीकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बुधवारी शहरातील जुना सतारे भागातील मरीमाता मंदिरापासून तसेच जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिर व शिवाजी नगरापासून स्वतंत्र तीन मदतफेर्या काढण्यात आल्या. विविध पदाधिकार्यांसह लोकप्रतिनिधी तसेच नागरीक त्यात सहभागी झाले होते. दरम्यान, पैशांसह धनादेशाच्या स्वरूपात नागरीकांना 10 सप्टेंबरपर्यंत मदत करता येणार आहे. शहरातील जळगाव जनता बँकेत त्यासाठी संपर्क साधण्याचे रा.स्व.संघ व जनकल्याण समितीतर्फे कळवण्यात आले आहे.
तीन भागातून निघारी मदतफेरी
शहरातील अष्टभूजा देवी मंदिर भागातून निघालेली मदतफेरी ब्राह्मण संघ, मरीमाता मंदिर, सराफ बाजार, पंजाब नॅशनल बँक, एलआयसी कार्यालय, शिवाजी कॉम्प्लेक्स काढण्यात आले तसेच जुना सतारा भागातील मरीमाता मंदिरापासून मदतफेरी काढण्यात येऊन यावल रोड, तार ऑफिस रोड तसेच शिवाजी नगरापासूनही मदतफेरी काढण्यात आली.
यांचा मदतफेरीत सहभाग
नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक मुकेश पाटील, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, पुरूषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक परीक्षीत बर्हाटे, वसंत पाटील, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, रमाशंकर दुबे, दिनेश नेमाडे, पवन बुंदले, लक्ष्मण सोयंके, रवी निमाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे देवगिरी संभाग सहकार्यवाह अनिल कुलकर्णी, जळगाव विभाग सहकार्यवाह नाना खांडवेकर, शाम भाटवडेकर, केदार ओक, प्रवीण दांडगे, डॉ.विजय सोनी, डॉ.विरेंद्र झांबरे, गणेश सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मदतफेरीतून जमा झालेल्या निधीचे मोजमाप सुरू असल्याचे सांगण्यात आले.