केरळमधील पूरग्रस्तांसाठी फैजपूरात मदत फेरी

0

फैजपूर- केरळ येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी फैजपूर येथील दिव्यांग बांधव, दीपाली गृप्स, लोणार सरोवर अपंग संस्था आणि खान्देश जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मदत संकलन फेरी काढण्यात आली. फैजपूर पोलिस स्टेशनपासून मदत फेरीचा शुभारंभ सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते झाला. रथगल्ली, लक्कडपेठ, पाण्याची टाकी, मारोती मंदिर, कुरेशी मोहल्ला, सुभाष चौकमार्गे सतपंथ देवस्थान ट्रस्ट येथे मदत फेरीचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी मदत निधी देऊन स्वागत केले. तेथून पुढे आठवडे बाजार, छत्री चौक मार्गे व्यापारी संकुलात आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी मदत फेरीचे स्वागत करण्यात आले. खाचणे हॉस्पिटलमार्गे नगरपरीषद, येथून प्रांताधिकारी कार्यालय येथे मदत फेरीचा समारोप प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी समस्त दिव्यांग बांधव तसेच दीपाली ग्रुप्सच्या अध्यक्षा दीपाली चौधरी झोपे, मुख्याध्यापक गणेश गुरव, लोणार सरोवर अपंग संस्था तालुकाध्यक्ष अहेसान कुरेशी, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप धर्मराज पाटील, पत्रकार संजय सराफ, देवेंद्र झोप, नितीन महाजन दिव्यांग सेना फैजपूर, नानाभाऊ मोची, राहुल कोल्हे पिंपरुड, योगेश चौधरी, विनोद बिर्हाडे, शेख अंसार शे.रहिम, शे.अशफाक शे.मुस्ताक, शे.अहेसान शे.ईसा, ईद्रीस खान, जहीर खान, नाझीम भाई, निज़ाम भाई यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधव, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.