केरळला ‘गुगल’तर्फे ७ कोटींची मदत

0

नवी दिल्ली : केरळसाठी सगळीकडून मदतीचा हात येताना दिसत आहे. आता केरळसाठी गुगल कंपनी सात कोटी रुपयांची मदत करणार आहे. भारतामध्ये एक गुगलचा कार्यक्रम झाला. यावेळी गुगल इंडियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले की, केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी Google.org आणि Googlers मिळून सात कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

अनेक उपाय योजनासह पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गुगलने Google Person Finder टूल विकसित केले आहे. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 417 लोकांचा मृत्यू झाला.