जळगाव : नुकत्याच केरळ राज्यात महापूरामुळे झालेल्या वित्तहानीमुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला आर्थिक सहाय्य म्हणून भरारी फाउंडेशनच्या सदस्यांमार्फत तसेच फाउंडेशनच्या कार्यात सढळ हाताने मदत करणार्या व्यक्तींमार्फत ५६ हजारांचा मदत निधी धनादेश स्वरूपात रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना सुपूर्त करण्यात आला. यावेळी उद्योगपती रजनीकांत कोठारी, नरेश खंडेलवाल, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आयुक्त चंद्रकांत डांगे, फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी, विनोद ढगे, अक्षय सोनवणे आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
राकेश पाटील, रमेशकुमार मुणोत, सोनाळकर अकॅडमी, निलेशसिंह वकपळ, नरेंद्र ठाकूर, सपन झुनझुनवाला, प्रज्ञा देशपांडे, वैशाली मधवन, राजेश मलीक, बजरंग अग्रवाल, आयुष मणियार, महेश गोरडे, नंदलाल गादीया, राजेश बिर्यानी धीरज सोनवणे, विनोद ढगे, दिलीप पाटील, एस. आर. राऊट, प्रा. संध्या सोनवणे, नरेश खंडेलवाल, नितीन बरडे, स्वरुप लुंकड, अतुलसिंह हाडा, बाळासाहेब मोझे, सुनील भंगाळे, मनोज काळे, निखिल वाणी, रवींद्र लढ्ढा, दिनेश वाघ, अनिल भोकरे, रामचंद्र पाटील, गजानन देशमुख, यश लढ्ढा, कैलास सोमाणी, सुरज झंवर, सुमीत कोठारी, गिरीश सुर्यवंशी, चंद्रशेखर तायडे, चेतन शर्मा, जयंत शिरसाठ, अमोल धांडे, पंकज बिर्ला, रितेश लिमडा, अॅग्रोवर्ल्ड, अॅड. हरुल देवरे, राहुल जाधव, बाळासाहेब सुर्यवंशी, मनोहर भारंबे, सचिन बह्राटे, सुनील पाटील यांची उपस्थिती होती.