केरळ सरकार विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन

0

धुळे । केरळमधील राज्य सरकार पुरस्कृत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या गुंडांनी केरळात हैदोस घातला असून संघ स्वयंसेवकांवरील निर्घुण हल्ल्याबरोबर भारतीय मजूर संघांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले वाढले आहेत या विरोधात भारतीय मजदूर संघातर्फे एक दिवशीय देशभर धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

दोषींवर कारवाईची मागणी
केरळातील मार्क्सवादी हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला असून कोणत्याही प्रकारचा विरोध साम्यवादी सहन करू शकत नाही. साम, दाम, दंड व भेद वापरून विरोधी विचार करणार्‍याला येनकेन प्रकारे संपविणे हा हिंसाचाराचा मार्ग ते अवलंबित असून या सर्व हिंसाचाराला केरळातील राज्य सरकारचा पाठिंबा आहे असा आरोप निवेदनात आला आहे. या हिंसाचारास ताबडतोब प्रतिबंध घालावा तसे दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रांत उपाध्यक्ष शिवाजी काकडे, अध्यक्ष सुनिल देवरे, घनःशाम जोशी, बी.एम. कुलकर्णी, नथ्थु मोरे, विठ्ठल पाटील, पंडीत भदाणे, भास्कर भामरे, गोरख सोनवणे आदी उपस्थित होते.