केर्‍हाळा गावातील 25 वर्षीय युवकाची आत्महत्या

Suicide of 25-year-old youth in Kerala village रावेर : तालुक्यातील केर्‍हाळा गावातील 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. देवानन ज्ञानेश्वर महाजन (25) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
केर्‍हाळा गावातील रहिवासी देवानन ज्ञानेश्वर महाजन या तरुणाने गुरुवार, 8 रोजी रात्री स्नानगृहातील लोखंडी अँगलला सुतळीच्या सहायाने गळफास घेतला. या प्रकरणी गजानन रामकृष्ण महाजन यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. अधिक तपास पोलिस कर्मचारी सुनील वंजारी करीत आहे.