केर्‍हाळाजवळ जुगारावर धाड, नऊ आरोपी जाळ्यात

0

रावेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील केर्‍हाळा गावाजवळील सुकी नदी पात्रात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत नऊ आरोपींना अटक करण्यात आली तर एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक नरेंद्र0 पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी उपनिरीक्षक डी.डी.ढोमणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर आदींनी कारवाई केली.