रावेर- तालुक्यातील केर्हाळा येथून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत तरुणीच्या पित्याने या प्रकरणी रावेर पोलिसात तक्रार नोंदवली आहे. अज्ञात ईसमाने आपल्या मुलीस फुस लावून व आमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहेत.