रावेर : तालुक्यातील केर्हाळे बु.॥ येथे शेतकर्याच्या गोदामातून हळदीचे पोते लंपास करण्यात आले होते. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. चोरी झालेल्या हळदीच्या 11 गोण्या व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. तपासाच्या दृष्टीने संशयीत आरोपींची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत.
225 पोते हळदीच्या पोत्यांची चेारी
केर्हाळे बु.॥ येथील शेतकरी विनय सतीष पाटील यांच्या केर्हाळे-कर्जोत रस्त्यावरील गोदामातून अज्ञात चोरट्यांनी 225 पोते हळद व रीओलिज कंपनीचे सीलबंद ठिबक नळ्यांचे बंडल व सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हिआर मिळून एक लाख 63 हजारांचा सामान 1 ऑगस्टच्या रात्री लांबवला होता. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीस गेलेल्या मालापैकी 11 गोणी 660 किलो वजनाची व 59 हजार 400 रुपये किंमतीची हळद पोलिसांनी जप्त केली आहे शिवाय गुन्ह्यात वापरलेली एक महिंद्रा मॅक्सिमो कंपनीची चारचाकी वाहन (एम.एच.19 एस. 6944) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोज वाघमारे, तपासी अंमलदार नाईक निलेश चौधरी, गुन्हे शोध पथकातील नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सुरेश मेढे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, कॉन्स्टेबल सुकेश तडवी, कॉन्स्टेबल महेश मोगरे यांनी कारवाई केली.