केर्‍हाळ्यात विकासकामांच्या श्रेयावरून सरपंचांसह युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षात जुंपली

0

रावेर- तालुक्यातील केर्‍हाळा बु.॥ येथे विकासकामांच्या श्रेयवादावरून सरपंच राहुल पाटील व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याने हा विषय ग्रामस्थांसाठी चर्चेचा ठरला आहे. गावात झालेली कामे जिल्हा परीषद की ग्रामपंचायत निधीची? या विषयावर गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केर्‍हाळा सरपंच राहुल पाटील यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांचे पती तथा भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी रावेर येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परीषद घेऊन सरपंचांच्या आरोपांना उत्तरे दिले.

दिशाभूल होतेय कामे आमचीच
केर्‍हाळा गावात ग्रामपंचायतीसमोर दहा लाखांचे काम मंजूर होते परंतु तेथे आधीच ग्रामपंचायतीने केल्याने तो निधी इतर ठिकाणी वॉर्ड क्रमांक दोनमध्ये वळवण्यात आला तसेच ज्ञानेश्वर नगरामध्येदेखील पेव्हर ब्लॉकसाठी तीन लाखांचा निधी आम्हीच मंजूर केला आहे. सरपंच राहुल पाटील दिशाभूल करीत असल्याचे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पत्रकार परीषदेत सांगिले.

झालेली कामे ग्रामपंचायतीची
केर्‍हाळा गावात काही महिन्यांपूर्वी अमोल पाटील यांनी एका सभेत झालली विकासकामे जिल्हा परीषद निधीतून केल्याचे सांगत ग्रामस्थांची दिशाभूल केली मात्र ही सर्व कामे ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातूून केली आहेत. यात ग्रामपंचायतीसमोर ज्ञानेश्वर नगरात पेव्हर ब्लॉक बसवणे, जिल्हा परीषद शाळा शाळा डिजिटल करणे ही कामे सभेमध्ये लोकांना दाखविले परंतु ती कामे ग्रामपंचायतीने केली आहेत शिवाय आमच्याकडे केलेल्या सर्व कामांचे पुरावेत आहेत. त्यांनी कामे केली असल्यास त्यांनी पुरावे जनतेपुढे द्यावेत, असे आव्हानच केर्‍हाळा बु.॥ येथील सरपंच राहुल पाटील यांनी केले आहे.