जळगाव । खेडी शिवारात अज्ञात चोरट्याकडून केळीचे घट कापून चोरून नेण्याचा प्रयत्न करतांना शेत मालक येत असल्याचे दिसून येताच त्याने पळ काढला असून त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल व मोबाईल जळगाव तालुका पोलिस स्थानकात शेत मालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खेडी येथील शेतकरी सोपान पुंडलिक पाटील (वय-43) यांचे वडीलोपार्जीत खेडी शिवारात गट क्रमांक 143 मध्ये तीन हेक्टर क्षेत्रफळाचे शेत असून सध्या त्या शेतात लावलेल्या केळीच पुर्णपणे वाढ झाली आहे. 15 मार्च 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शेतकरी सोपान पाटील हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना शेताच्या बांधावर सुझुकी मोटारसायकल क्र.(एमएच 19 एल 9108) लावलेली दिसल्याने त्यांना शेतात चोर केळी चोरण्याच्या इराद्याने आल्याची शंका त्यांना आली. त्यांना लगेचच शेतात घूसून पाहणी करत असतांना 30-35 वयोगटातील अनोळखी व्यक्ती दिसून आला. चोरट्याने शेत मालकाला पहताच तेथून त्यान पळ काढला. त्याने 5 हजार 120 रूपयांचे किंमतीच केळीचे 32 घट कापून नुकसान केले. शेतकर्याने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्नात त्याला चायना मोबाईल खाली पडला. मात्र अज्ञात चोरटा तेथून फरार झाला. शेताच्या बांधावर लावलेली मोटारसायकल व मोबाईल शेतकरी सोपान पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधिन केले. व अज्ञात चोरट्याविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.