राष्ट्रवादी किसान सभे कडून पालकमंत्र्याचा निषेध ; वादळामुळे दिड कोटीचे नुकसान
रावेर (प्रतिनिधी)- वादळी पावसामुळे करोडो रुपयांच्या झालेल्या नुकसानीला सहा दिवस उलटले, शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळले असून ज्यांच्या कडून मदतीची अपेक्षा आहे ते जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी शेतकर्यांनी दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे निषेध करण्यात आला. 1 जूनला रावेर पूर्व तर 5 जूनला सावदा परीसरात वादळी पावसाने तडाखा दिला आहे यामुळे आतापर्यंत केळीचे 63 कोटींचे नुकसान झाले आहे.
लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
नागपुर येथून राज्यसभा खासदार डॉ.विकासजी महात्मे, भुसावळ येथून माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, नीळकंठ चौधरी यांनी या परीसरातील शेतकर्यांच्या भेटी घेऊन शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी माजी शिक्षण सभापती सुरेश धनके,रावेर माजी नगराध्यक्ष शितलभाऊ पाटील,उपसरपंच नीलेश सावळे,संदीप सावळे,रामेश्वर नाईक आदी कार्यकर्ते शेतकरी यावेळी उपस्थित होते.
तीन गावांचे दीड कोटीचे नुकसान
वादळामुळे रावेर पूर्व भागात केळीला मोठा फटका बसला असून पाच दिवस उलटले तरी अजुन पंचनामे पूर्ण झालेले नाहीत तर सावदा परिसरात आलेल्या वादळामुळे तीन गावातील 41 शेतक-यांची दीड कोटीचे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.