केळीने भरलेला ट्रक खड्डयात अडकला

0

जळगाव- केळीने भरलेला ट्रक रविवारी दुपारी अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्या मोठ्या खड्डयात अडकला़ ही घटना रविवारी दुपारी दपोरा येथील रस्त्यावर घडली.

दापोरा गावातील रस्त्यांची अत्यंत दुर्देशा झाली आहे़ रस्त्यावर लहान-मोठी खड्डे पडली असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे़ तोच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्डयांमध्ये पाणी साचले असून चिखल सुध्दा झालेले आहे़ त्यामुळे रविवारी दापोरा गावातील रस्त्यावरून जात असलेले केळीने भरलेला ट्रक हा अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात अडकला़ ट्रक खड्यातून काढण्याचा प्रयत्न चालकाने केला, मात्र अपयश आले़ अखेर नागरिकांच्या व जेसीबीच्या मदतीने ट्रक हा खड्डयातून बाहेर काढण्यात आला.