केळीपाडा गावास राज्य परिवहन महामंडळाकडून होलीकोत्सवाची भेट

0

पिंपळनेर । भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 71 वर्षे झाली तरी पश्‍चिम पट्ट्यतील अति दुर्गम आदिवासी भागातील केळीपाडा ता. साक्री या गावात बस सेवा सुरू नव्हती राजेंद्र देवरे व परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नातून धुळे ते केवळीपाडा बस सुरू करण्यात आली. यावेळी होळीचै औचित्य साधुन केळीपाडा ही बस सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी केळीपाडा येथे आल्यानंतर ग्रामस्थांनी या बसचे ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली. तसेच बसचे चालक प्रकाश शिंदे व वाहक अनिता डोमसे यांचा सत्कार करून त्यांची ही सहवादय मिरवणूक काढण्यात आली.

ग्रामस्थांनी विभाग नियंत्रकांचे मानले आभार
धुळे एसटी विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या सहकार्याने बससेवा सुरु झाली. त्यांचे ग्रामस्थांनी कौतूक करून आभार मानले. पश्‍चिम पट्ट्यातील नागरिकांना धुळे येथे कामानिमित्त जाण्यासाठी सकाळीच सकाळी 10 ते 11 वाजता गाडीच नव्हती. ही गाडी वेळेवर सुरू झाल्याने विभाग नियत्रकांचे आभार मानले. गाडी गावात आल्याबरोबर ग्रामस्थांनी प्रथम चालक शिंदे व वाहक ढोमसे यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी गाजर्‍या(शेठ), माजी जि.प.सदस्य मोत्या वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन केले. सरपंच देवलीबाई गावीत, उपसरपंच विक्रम राऊत , ग्रा.पं.सदस्या सुमित्रा आनंदा मावळी,माजी उपसरपंच सरूपसिंग जोम्या गावीत यांच्या हस्ते (एसटी चालक) प्रकाश शिंदे,व (वाहक)अनिता ढोमसे यांचे शाल,श्रीफळ ,पुष्प देऊन स्वागत केले. बससेवा सुरू करण्याकामी येथील शिक्षक विनोद खंडेराव देवरेंच्या मार्गदर्शनातून बस सेवा व हा कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी मणिराम गणपत राऊत , वनसिंग जत्र्या देसाई.,दिवाणजी जत्र्या देसाई, दिलीप जोम्या गावीत, कारभारी काका, इतर ग्रामस्थ ,महिला भगिनी ,तरुणवर्ग ,विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते. केळीपाडा ते धुळे या बस सेवेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे – साक्री -केळीपाडा बस सकाळी 9:00 वा.साक्रीहुन निघेल .,9:30 वा.पिंपळनेर ते केळीपाडा.,… 10:15 वा.केळीपाडा ते धुळे.