खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय कृषी राधामोहन सिंग यांच्याकडे मागणी
मुक्ताईनगर- निपाह रोगाचे विषाणू केळीवर असल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत आणि गेल्या चार ते पाच दिवसापासून तेथील बाजारपेठेत सुमारे एक हजार टन केळी पडून आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, मालवाहतुकदार घाबरले आहेत. जळगाव आणि बुलढाणा परिसरातील केळीवर कोणत्याही प्रकारची लागण नसून, उत्तर भारतातील पडून असलेल्या केळीमधील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवावेत. खान्देशातील केळी वर निपाह रोगाचे विषाणू असल्याची अफवा पसरवनार्यावर कडक कारवाई करावी, सरकारकडून खान्देशातील केळीवर निपाह रोगाचे विषाणू नसल्याचा संदेश प्रसारित करण्यात यावा जेणेकरून जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, मालवाहतूकदार यांचे नुकसान होणार नाही व त्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडे केली आहे.