केळी आपदग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी रावेरमध्ये 18 रोजी रेल रोको

0

पीआरपी महामंत्री जगन सोनवणेंचा फैजपूरात पत्रपरीषदेत इशारा

फैजपूर- रावेर तालुक्यात वादळ वार्‍यात झालेल्या केळी नुकसानग्रस्त शेतकर्‍याना नुकसान भरपाई मिळण्यासाठी रावेर येथे 18 जूनला रेल रोको आंदोलन करणार असल्याची माहिती पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांनी मंगळवारी फैजपूर येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली. सोनवणे म्हणाले की, केळी उत्पादक शेतकरी यांना तातडीने भरपाई मिळावी या मागणीसाठी पीआरपी व विविध संघटनाचे कार्यकर्ते व केळी उत्पादक तसेच सर्व शेतकरी 18 जून रोजी रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाद्वारे रावेर रेल्वे स्टेशनवर जाऊन दादर-गोरखपूर एक्सप्रेसवर केळी घड रेल्वे रुळावर ठेवून करून आंदोलन करतील तसेच केंद्र व राज्य सरकारला धारेवर धरणार असून शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करणार असल्याचे ते म्हणाले.

शेतकर्‍यांचे दुःख पाहण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ नाही
जळगावचे पालकमंत्री यांच्याकडे सुदैवाने कृषी व मुख्यमंत्री पद आहे मात्र त्यांना जळगांव जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे दुःख पाहण्यासाठी वेळ नाही शिवाय ते आलेदेखील नाहीत. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी अन्यथा 18 जून रोजी रेल रोकोचा इशारा त्यांनी दिली. कृषी मंत्री, पालकमंत्री, प्रभारी मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेटी न दिल्यास त्यांना रावेर व जळगांव जिल्हा बंदी करणार असल्याचा इशाराही सोनवणे यांनी दिली.

माजी आमदारांना कुणी राजकारण शिकवू नये
रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांना शाब्दिक आश्वासनांऐवजी तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी करीत सोनवणे म्हणाले की, न माजी आमदार शिरीष चौधरी यांना त्यांचे आजोबा व वडील असा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांना राजकारण कोणीही शिकवू नये व भाष्य करू नये. आमची पार्टी व विविध दहा संघटना त्यांच्यासोबत आहेत. पीआरपी काँग्रेस युतीसाठीच आम्ही जिल्ह्यात काम करू, असे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पीआरपी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख आरीफ शेख, पीआरपी श्री छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष गोपी साळी, भारतीय ओडफ संघ क्रांती प्रमुख महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक भालेराव, फैजपूर शहराध्यक्ष इम्रान शेख, यावल तालुका प्रमुख तथा उपसरपंच रतन वानखेडे, रावेर तालुका प्रमुख शांताराम तायडे, बबलू तडवी, मोहसीन शेख, किरण मेढे, जलील कुरेशी आदींची उपस्थिती होती.