जळगाव : मास्टर कॉलनीतील चटोरी गल्लीत केळी खरेदी करण्यावरून झालेला शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच संशयीतांविरोधात गुन्हा
अजहर खान इकबाल खान (28, अक्सानगर, मेहरूण, जळगाव) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून रविवार, 1 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता अजहर खान हा मित्र अशरफ खान याच्यासोबत मास्टर कॉलनीतील चटोरी गल्लीत केळी घेण्यासाठी गेला असता केळी विक्रेत्याकडे केवळ दोन डझन केळी शिल्लक होती ते अजहर खान याने खरेदी केली. त्याठिकाणी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे यांनी केळी आम्ही घेतल्याचे सांगून शिवगीळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दानिश पिरजादे याने खिश्यातून चाकू काढून अशरफ खान आणि अजहर खान यांच्यावर वार केला. या हल्ल्यात दोन्ही जखमी झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
अजहर खान यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी दानिश पिरजादे, पप्पू पिरजादे, दारा पिरजादे, मुस्तकिम पिरजादे आणि रहिम पिरजादे (सर्व रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.