केळी नुकसान ; मध्यप्रदेशातील शेतकर्‍यांना हेक्टरी लाखाची मदत

0

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांची ग्वाही ; नुकसानग्रस्त बागांची पाहणी

रावेर- रावेर तालुक्याला लागून असलेल्या मात्र मध्यप्रदेशात समाविष्ट असलेल्या नुकसानग्रस्त केळी बागांची गुरुवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी पाहणी करून 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी एक लाखांची मदत देण्याचे आश्‍वासन दिले शिवाय -बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासह 31 डिसेंबरपर्यंत खंडित झालेल्या विजेचे बिलदेखील शासन भरणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी व्याजाने रक्कम घेतली आहे शिवाय शेतकर्‍यांचे व्याजदेखील शासन भरणार असून पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन देण्यात आले. पुढच्या पिकांसाठी शून्य टक्के दराने कर्ज दिले जाणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

खान्देशातील शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढल्या
मध्यप्रदेशातील सरकारने त्या भागातील शेतकर्‍यांना दिलासा दिला असलातरी खान्देशातील शेतकर्‍यांना मात्र नुसती शासनाकडून आश्‍वासनेच मिळत असून प्रत्यक्षात मदत मिळणार कधी? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.