केळी बागेत पाने कापताना वीज कोसळल्याने तरुणाचा मृत्यू : मयत पिंपळीतील रहिवासी

Youth in Pimpli dies due to lightning अमळनेर : चाळीसगाव तालुक्यातील पिता-पूत्रांचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच केळीच्या बागेत पाने कापण्यासाठी गेलेल्या तरुणावर वीज पडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील गलंगी गावाजवळ शनिवार, 10 रोजी दुपारी चार वाजता घडली. अनिल गुलाबराव पवार (30) असे मयताचे नाव आहे.

पिंपळी गावात शोककळा
चोपडा तालुक्यातील पिंपळी येथील अनिल गुलाबराव पवार (30) हा तरुण गलंगी गावाजवळ केळी पाने कापायला गेला असता त्याच्या अंगावर वीज कोसळली व त्यात जागीच त्याचा मृत्यू ओढवला. तत्पूर्वी हातेड येथे त्यास हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अनिलचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तरुणाच्या पश्चात आई आणि पत्नी असा परीवार आहे.