दोघा संचालकांविरोधात गुन्हा दाखल
जामनेर: तालुक्यातील नेरीदिगर येथील केळी व्यापारी शेख रशीद शेख बशीर यांच्याकडुन घेतलेल्या मालाचे १० लाख ९२ हजार ४११ रूपये अद्याप दिले नसल्याने नोएडा येथील कंपनीच्या दोन संचालक/मालकांविरोधात जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. कमलेश यादव (साईफृट कंपनी होशीयारपुर नोएडा), सुंदर यादव (एनएफसी फृट कंपनी हबीबपुर, नोएडा) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शेख रशीद शेख बशीर रा. नेरीदिगर या व्यापार्याकडुन नेहमीप्रमाणे नोएडास्थीत कंपनीला दिनांक १ जुन रोजी सुमारे ११ लाखाचा माल (केळी) विकला, त्यानंतर फिर्यादीने वेळो-वेळी संबंधीत कंपनी व त्यांच्या मालक/संचालकांशी संपर्क करूनही अद्याप पावेतो पैसे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर दुरध्वनी संपर्क बंद केला.त्यामुळे फिर्यादीला फसवणुकीची शंका आल्याने वरील दोघांवर भादवी ४२० प्रमाणे गुन्हाची नोंद केली,पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.