जळगाव: राज्यात राजकारण बदलत आहे. महाविकास आघाडीचे सरकार मजबुत आहे. हे सरकार टिकणार आहे, पूर्ण पाच वर्ष चालणार आहे. भाजपातून अनेक लोक बाहेर पडत आहे. भाजपची सत्ता येणार आहे येणार आहे असे वारंवार भाजपचे नेते सांगत आहे. मात्र कार्यकर्ते थांबविण्यासाठी आपले सरकार येणार आहे असे सांगावे लागते असा टोला माजी मंत्री एकनाथराव यांनी भाजपला लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित जिल्हा बैठकीत ते बोलत होते.
अहंपणामुळे भाजपाची सत्ता गेली. तरी देखील अहंपणा सुटत नाही, मी पुन्हा येईल पुन्हा येईल असे काहीही होणार नाही असे सांगत त्यांनी फडणवीस यांना टोला लावग्ला आहे. जे आमच्यावर टिका करतात ते गावातही निवडुन येत नाही, अनेक लोक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत असेही खडसे यांनी सांगितले.